Posts

निष्कर्ष ...!!

निष्कर्ष ...!! चुकलेल्या माणसाला माफ का करावे ? माणसातील माणुसपणाने … आणि तेही मोठ्या मनाने …?? का काढू नयेत माणसाने माणसांच्या वागण्याचे निष्कर्ष ?? कधीही …!! माणसाला छळतात असे प्रश्न कधी कधी … कधीही …  केव्हाही … त्याच्याही नकळत … पण नेमकं काय असतं एका माणसाच्या वागण्याचे दुसऱ्याने निष्कर्ष काढणं …  आणि एका माणसानं दुसऱ्याला  माफ करणं …? माणूस कधी बघतो का  विचारून असा प्रश्न ... आपणच आपल्याच मनाला … दुसऱ्याच्या वागण्याचा निष्कर्ष काढणं, आणि त्याला आपल्या तराजूत  तोलणं, आहे का न्याय्य ..?? का लावायचा कस सोन्याच्याच कसोटीवर इतरही धातूंचा ...?? का माफ करण्यातही असतो स्वार्थ ... माणसातलं माणूसपण दाखवण्याचा आणि मोठ्ठया मनाचे प्रदर्शन करण्याचा …!! काढावेत निष्कर्ष … माणसानं माणसांच्या वागण्याचे ... फक्त त्याला तोलताना घ्यावा तराजू, त्याच्याच अनुभवांचा … करावं माफ इतरांना … त्यात असलाच स्वार्थ, तर तो केवळ आपल्या मनाला त्रास न देण्याचा ... मनःशांती ढळू ना देण्याचा … आपल्या प्रसन्नतेला परावलंबी न करण्याचा … जळू देऊ नये आपले मन त्वेषाने, द्वेषाने, संतापाने … जाळावे आपल्...

एक संवाद : देवासोबत

Image
एक संवाद : देवासोबत ंंंंंंंंंंंंंंं एकदा माझ्या स्वप्नात देव आला,..... असतील प्रश्न मनात तर विचार म्हणाला... मनाशीच घातला मी माझ्या प्रश्नांचा मेळ, म्हणालो- "आहेत शंका अनेक पण तुला आहे का वेळ ?" देव हसला... आणि बोलला, माझा वेळ, अमर्याद - अनंत, विचार मोकळेपणाने, ठेवू नकोस कुठलीही खंत... मी म्हणालो- देवा, मानवी मुल्यांमधे काही वाटतो का तुला बदल ? मानवी जीवनातील कुठल्या गोष्टीबद्दल वाटतं का तुला नवल ? देव म्हणाला- आहेत अशा गोष्टी अनेक तू विचारलं म्हणून सांगतो, पण विचार कर स्वतःशीच का तू मला विचारतो... माणूस बालपणाला कंटाळतो मोठं होण्यासाठी धडपडतो, अन् मोठा झाल्यावर मात्र बालपणच पुन्हा मागतो !!! धावधाव धावून, आरोग्य गमावतो पैसा मिळविण्या करीता, आणि मग पैसाच गमावतो आरोग्य राखता राखता !!! भविष्याबद्दलच्या काळजीने माणसाचे मन होते चिंतातूर, वर्तमान विसरतो, आणि जगतो सापडत नाही जीवनात सूर !!! जगण्यासाठी करतो धडपड स्मरण त्याला मरणाचं नाही, मरतो तेव्हा वाटतं, की हा खरं जीवन कधी जगलाच नाही !!! देवाच्या हाती होता माझा हात मी झालो एकदम ...